आम आदमी पार्टीची फोंडा पोलिसात तक्रार दाखल
प्रतिनिधी / फोंडा
वीज खात्याचे वाहन रस्त्यावर धावण्यासाठी पात्र आहे की नाही? याची चाचणी न करता फिटनेस देणे हा वाहतूक खात्याचा कारभार झालेला असून सरकारच्या अशा धोरणामुळेच बोरी सर्कल येथे वीजखांबवाहू ट्रकच्या अपघातात तिघा निष्पाप वीजकर्मचाऱयांचा मृत्यू ओढावलेला आहे. या अपघाताला सर्वस्वी मुख्य वीज अभियंता व वाहतूक संचालक यांना जबाबदार धरून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी तक्रार आम आदमी पक्षातर्फे यांनी फोंडा पोलिस स्थानकात दाखल केली आहे.
यावेळी बोलताना आपचे परशुराम सानुर्लेकर यांनी या कृतीला सरकार जबाबदार असल्याचे म्हटले असून 28 वर्षे जुने असलेल्या कालबाहय़ वाहनाची फिटनेस डोळेझाक पद्धतीने केली जाते का असा सवाल उपस्थित केलेला आहे. सरकारी वाहनांना चाचणीशिवाय फिटनेस देण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सदर अपघाताची सखोल चौकशी व्हावी अशी माण्गी केली आहे. मालवाहू गाडीच्या मागील हौदात वीज कर्मचाऱयांना का कोंबले असा सवाल उपस्थित केला आहे.









