ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील चोवीस तासात 10 हजार 483 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 90 हजार 262 वर पोहचली आहे, तर कालच्या दिवसात 300 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
- आतापर्यंत 3 लाख 27 हजार 281 रुग्ण कोरोनामुक्त!
पुढे ते म्हणाले, त्यातच दिलासादायक बाब म्हणजे कालच्या दिवसात 10,906 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यामुळे आतापर्यंत 3 लाख 27 हजार 281 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 66.76 टक्के इतके आहे.
सध्या राज्यात 1 लाख 45 हजार 582 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 17 हजार 092 वर पोहोचला आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.49 टक्के इतके आहे.
सध्या राज्यात 9 लाख 82 हजार 075 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 35 हजार 262 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.









