वार्ताहर / उचगांव
करवीर तालुक्यातील गांधीनगर परिसरातील सहा गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शुक्रवारी अकराने वाढली. गांधीनगर परिसरामध्ये एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 325 वर पोहोचली आहे, तर मृतांची संख्या आजअखेर 11 झाली आहे.
गांधीनगरमध्ये शुक्रवारी चार, तर वळीवडेत एक रुग्ण आढळून आला. गांधीनगरपैकी गडमुडशिंगी हद्दीत रुग्ण संख्या स्थिर राहिली. उचगावमध्ये 2 तर चिंचवाड येथे चार रुग्ण आढळून आले. वसगडे येथे एकही रुग्ण आढळून आला नाही. गांधीनगरमधील 78 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
गांधीनगर परिसरातील गाववार कोरोना रुग्णांची गुरुवार अखेरची संख्या अशी – गांधीनगर (147), वळिवडे (66), उचगाव (64), गडमुडशिंगी (27), चिंचवाड (21). याप्रमाणे गांधीनगर परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 325 वर पोहोचली आहे.
Previous Articleसातारा जिल्ह्यात ऑगस्टखेर बाधितांचा आकडा होईल 10,000 पार
Next Article केरळमध्ये भीषण विमान दुर्घटना, विमानाचे दोन तुकडे








