बरे झाल्याने तब्बल 163 रुग्णांना सोडले घरी
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी तब्बल 291 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 163 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिली.
आज, 3082 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 291 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 2791 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 291 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 163 पुरुष आणि 128 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4874 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 36409
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 4874
-प्राप्त तपासणी अहवाल : 36272
-प्रलंबित तपासणी अहवाल : 137
-निगेटिव्ह अहवाल : 31398
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 144
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1786
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 2945
Previous Articleभोगावतीचे पाणी उभ्या पिकात,शेतकरी आर्थिक अडचणीत
Next Article कोल्हापूर : चूक रुग्णालयांची, शिक्षा पंचक्रोशीला









