ऑनलाईन टीम / गाजीपूर :
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांची जम्मू काश्मीरच्या उपराज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दिला त्यानंतर त्यांच्या जागी मनोज सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिराने गिरीश मुर्मू यांनी आपला राजीनामा दिला. त्यानंतर मुर्मू यांची राजीव महर्षी जे कैग मधून निवृत्त होणार आहेत त्यांच्या जागी कैगचे महालेखाकार म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राजीव सिन्हा हे गाजीपूरचे माजी खासदार असून ते भाजपचा मोठा चेहरा म्हणून ओळखले जाते. राजीव सिन्हा हे गाजीपूर जिल्ह्यातील मोहनपूरा गावाचे रहिवासी आहेत. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांच्याकडे रेल्वे राज्यमंत्री पदाची जबाबदारी होती.