ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील 24 तासात 56 हजार 282 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 904 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 19 लाख 64 हजार 537 वर पोहचली असून, मृतांची संख्या 40 हजार 699 एवढी आहे.

सध्या देशात 5 लाख 95 हजार 501 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 13 लाख 28 हजार 337 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आतापर्यंत देशात 2 कोटी 21 लाख 49 हजार 351 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 6 लाख 64 हजार 949 रुग्णांची तपासणी बुधवारी एका दिवसात करण्यात आली.
महाराष्ट्रात आतापर्यंत 4 लाख 68 हजार 265 रुग्ण आढळले आहेत. तामिळनाडूत 2 लाख 73 हजार 460, दिल्ली 1 लाख 40 हजार 232, गुजरातमध्ये 66 हजार 669, मध्यप्रदेश 35 हजार 734, आंध्र प्रदेश 1 लाख 86 हजार 461, बिहार 64 हजार 770, राजस्थान 47 हजार 272, उत्तरप्रदेश 1 लाख 4 हजार 388 तर पश्चिम बंगालमध्ये 83 हजार 800 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.









