प्रतिनिधी / कणकवली:
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेले उदय सामंत हे मुंबई येथे विलगीकरणात होते. त्यांचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये ‘आपले आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोविड टेस्ट निगेटिव्ह आल्याचे’ त्यांनी जनतेला उद्देशून म्हटले आहे.









