बेंगळूर/ प्रतिनिधी
राज्यातील नेत्यांना कोरोनाची लागण होण्याची प्रक्रिया सुरूच आहे. जेडीएस नेते आणि माजी मंत्री जीटी. देवगौडा यांना बुधवारी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जीटी देवेगौडा यांनी ट्विटरवर याची माहिती दिली आहे. तसेच ते घरी उपचार घेत असल्याचे त्यांनी म्हंटल आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना त्यांनी तपासणी करूनघेबण्याचे घेण्याचे असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामैय्या यांनाही मंगळवारी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांवरही उपचार सुरु आहेत.