बेंगळूर /प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. मंगळवारी राज्यात ६ हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहेत. त्या पाठोपाठ राजधानी बेंगळूरमध्येही कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. बेंगळूरमध्ये कोरोनाने आतापर्यंत ११३४ लोकांचा बळी गेला आहे, कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी मंगळवारी बेंगळूर शहरातील मृत्यू दर हा इतर मेट्रो शहरांपेक्षा सर्वात कमी असल्याचं म्हंटल आहे.
कर्नाटक आणि बेंगळूरमधील मृत्यूचे प्रमाण इतर राज्यांच्या आणि मेट्रो शहरांच्या तुलनेत समाधानकारक आहे, असे सुधाकर यांनी म्हंटले आहे. बंगळूरमध्ये इतर महानगरांच्या तुलनेत सर्वात कमी मृत्यूची नोंद आहे. म्हणजेच ११५ मृत्यू, तर राज्यात दर दशलक्ष लोकसंख्येमध्ये ३९ मृत्यू आहेत.









