ऑनलाईन टीम / जम्मू :
जवळपास 5 महिन्यांनी 16 ऑगस्टपासून जम्मू काश्मीर मधील सर्व धार्मिक स्थळे सुरू केली जाणार आहेत. मात्र, मिरवणूक आणि धार्मिक आयोजनांवर अजूनही बंदी कायम असणार आहे. सरकारकडून या संदर्भात अधिक विस्तृतपणे सूचना लकवरच जारी केल्या जातील.
या सोबतच जिम आणि योग केंद्रे सुरू करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी त्यांना एसओपी चे पालन करावे लागणार आहे. सरकारकडून नवीन गाईड लाईन जारी करण्यात आली आहे. या नियमांचे पालन आजपासूनच करावे लागणार आहे.
नवीन नियमानुसार, सिनेमा हॉल, बार, स्विमिंग पूल, शाळा कॉलेज अजूनही बंदच असणार आहेत. आंतरराज्यीय किंवा आंतरसंभागिय वाहतूक सेवा देखील बंद ठेवली जाणार आहे. मात्र ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये अंतरजनपदीय वाहतुकीस परवानगी मिळाली आहे.
बाहेरील राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी पहिल्या प्रमाणेच नियम पाळावे लागणार आहेत. ट्रेन किंवा विमानाने येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाइन केले जाईल तर रोड प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वारंटाइन केले जाणार आहे. तसेच सर्व जिल्ह्यांमध्ये रात्री दहा ते सकाळी पाच वाजेपर्यंत जनता कर्फ्यू असणार आहे.









