ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांनी त्यांना घरी सात दिवस विलागिकरणात राहण्याचा आणि स्वतः च्या प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, शिवराज सिंह चौहान यांचा तिसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर बुधवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 25 जुलै रोजी त्यांनी स्वतः ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांना भोपाळ मधील चिरायू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रुग्णालयातून बाहेर पडल्यावर शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छाशक्ती आणि मार्ग काढण्याची प्रवृत्ती त्यांना आज भारतातील 500 वर्षातील सर्वोत्तम नेता बनवत आहे. 500 वर्षांपूर्वी जो महायज्ञ सुरू झाला होता त्याचे फळ आज मिळाले.









