ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
नेपाळच्या पावलांवर पाऊल ठेवत पाकिस्ताननेही देशाचा नवीन राजकीय नकाशा जारी केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका बैठकीत देशाचा नवीन नकाशा जारी करत लडाख, जम्मू-काश्मिरच्या सियाचीनसह गुजरातच्या जूनागढवर दावा ठोकला आहे.
पाकिस्तानने यापूर्वीही लडाख आणि जम्मू-काश्मीरवर दावा ठोकला होता. यावेळी पाकने गुजरातच्या जुनागढला देखील आपल्या नवीन नकाशात दाखवले आहे. पाकिस्तान हा नकाशा संयुक्त राष्ट्रात देखील सादर करणार आहे.
पाकच्या सरकारी वृत्तवाहिनीवर इम्रान खान यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशाच्या नव्या राजकीय नकाशाला मंजुरी मिळाली आहे. पाकिस्तानच्या इतिहासातील हा ऐतिहासिक दिवस आहे. पाकिस्तानातील शाळा आणि महाविद्यालयांमध्येही या नकाशाचा वापर केला जाईल. लवकरच जगासमोर हा नकाशा सादर केला जाईल.









