प्रतिनिधी/ बेळगाव
जात-पात, भाषा-भेद न बाळगता सहकार क्षेत्रात कार्य केल्यामुळेच येथील मराठा बँकेची उल्लेखनीय प्रगती झाली आहे, असे प्रतिपादन कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव शंकरगौडा पाटील यांनी केले.
मराठा मंदिर इमारतीतील मराठा बँकेच्या चौथ्या एटीएम केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन दिगंबर पवार होते. व्यासपीठावर बँकेच्या उपाध्यक्षा निना काकतकर, मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव, ज्ये÷ संचालक दीपक दळवी, लक्ष्मण होनगेकर, बाळासाहेब काकतकर, सुशिल कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
शंकरगौडा पाटील यांच्या हस्ते फीत कापून चौथ्या एटीएमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संचालिका रेणू किल्लेकर, संचालक बी. एस. पाटील, मोहन चौगुले, शेखर हंडे, लक्ष्मण नाईक, मराठा मंदिरचे संचालक नेताजी जाधव, शिवाजी हंगिरगेकर, नेमीनाथ कंग्राळकर, नारायणराव किटवाडकर, मराठा बँकेचे व्यवस्थापक गजानन हिशोबकर, शाखा व्यवस्थापक सुधाकर पाटील उपस्थित होते.









