सोलापूर : प्रतिनिधी
मनपा क्षेत्रातील बुधवार, 5 ऑगस्टपासून रविवार वगळता सर्व प्रकारची व दोन्ही बाजूंची दुकाने सोमवार ते शनिवार रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत चालू राहतील, असे आदेश मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी जारी केले.
महापालिका क्षेत्रातील दुकाने चालू करण्यासाठी व्यापाऱ्यांची अनेक निवेदने आली होती. या निवेदनावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर श्रीकांचना यन्नम यांच्याशी मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी चर्चा केली. तसेच बाजारपेठेचा अभ्यास केला. त्यानुसार सदर निर्णय घेण्यात आला असल्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.
आदेशात म्हटले आहे की, पूर्वी सम-विषम पध्दतीने दुकाने सुरु ठेवण्याचा आदेश रद्द केला आहे. त्या एवजी ५ ऑगस्टपासून सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रकारचे बाजार व बाजारपेठा रविवारी वगळता सोमवार ते शनिवार या दरम्यान सुरु राहतील. मात्र अत्यावश्यक सेवा असलेले डेअरी, दुध विक्री करणारी दुकाने, अत्यावश्यक सेवा देणारे उपक्रम, सलून, स्पा व केश कर्तनालये, मटन विक्रीची दुकाने व होम डिलीवरी देणारे हॉटेल यापूर्वी दिलेल्या आदेशाप्रमाणे रविवारी देखील सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत चालू राहतील.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








