इस्लामपूर / प्रतिनिधी
इस्लामपूर येथील निमीष दशरथ पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ३८९ वा क्रमांक मिळवत इस्लामपूरच्या नावलौकिकात भर टाकली. निमिष यांचे प्राथमिक शिक्षण येथील डॉ.व्ही. एस. नेर्लेकर प्राथमिक विद्यालयात झाले. माध्यमिक शिक्षण आदर्श बालक मंदिर हायस्कूल येथे झाले. चौधी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतही त्यांनी यश संपादन केले होते.
एमटीएस परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त केली होती. मुंबईच्या सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनीअरींग मधून मेकॅनिकल इंजिनीअरींगची पदवी घेऊन त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी थेट दिल्ली गाठली. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले. पहिल्या व दुसऱ्या प्रयत्नात ते मुलाखतीपर्यंत गेले. मात्र अंतीम यश आले नाही. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी यश मिळवले. अभ्यासातील सातत्य, चिकाटीजिद्द आणि पालकांचे प्रोत्साहन यामुळे हे यश प्राप्त झाले अशी प्रतिक्रीया निमिष पाटील यांनी व्यक्त केली. केआरपी कन्या महाविद्यालयातील प्रा.दशरथ पाटील यांचे ते चिरंजीव आहेत. निकाल समजताच निमीष यांच्या वर्गमित्रांनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतिषबाजी केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








