कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. शहरात सोमवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून आज दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. आज काही ठिकाणी झाडांची पडझड झाली. शास्त्रीनगर, पंचायत समिती रोड, महालक्ष्मी चेंबर्ससह काही ठिकाणी झाडांची पडझड झाल्याच्याही घटना घडल्या आहे. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास शास्त्रीनगरमध्ये एक झाड पडले. तर दुपारी एकच्या सुमाराल पंचायत समिती रोडवरही झाड पडले. तर दुपारी साडेतीनच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्ससमोर झाड कोसळले. या झाडाखाली चार गाड्या सापडल्या असून त्यांचे नुकसान झाले आहे. परंतु, कोणत्याही घटनेत जीवितहानी झाली नाही.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








