ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते पुढील चार वर्षे किंवा पुढील आदेश येईपर्यंत या पदावर कार्यरत राहणार आहेत. केंद्र सरकारने या संदर्भात पत्रक काढून याबाबत माहिती दिली.

नवल किशोर राम हे 2008 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते मूळचे बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील आहेत. नुकताच त्यांचा देशातील 50 सुपरफाईन जिल्हाधिकाऱ्यांच्या यादीत समावेश झाला होता. एका संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार नवल किशोर राम यांची या यादीत निवड करण्यात आली होती.
पुणे जिल्हाधिकारी पद सांभाळण्यापूर्वी त्यांनी औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले होते. 2018 मध्ये नवल किशोर राम यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाचा पदभार स्वीकारला होता.








