● सातारा तालुक्यात रुग्ण वाढले
● सोनापुरात संसर्ग साखळी 36 बाधित
● शाहूपुरीत एका दिवसात 15 बाधित
● प्रशासनाने लढय़ाची रणनिती बदलली
● हेल्मेटसक्तीला नागरिकांचा विरोध
● बाजारपेठेला शिस्तीची गरज
प्रतिनिधी/सातारा
कोरोनाच्या अंतिम टप्प्यातील लढाईने उग्र रुप धारण करत जिल्हय़ाच्या कानाकोपऱयात अस्तित्व दाखवले आहे. दुसरीकडे मुंबई व दिल्ली सारख्या कार्पोरेट शहरात कोरोनाचा वेग मंदावला असला तरी सातारा जिल्हय़ात रात्रीच्या अहवालात दररोज बाधितांची संख्या वाढतच आहे. जिल्ह्यात तपासणींचा वेग वाढवल्यानंतर आता लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना बाधितांना घरीच राहून उपचार घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने होम आयसोलेशनचा पर्याय पुढे आणत रणनिती बदलली असून त्यासंदर्भात मार्गदर्शक सूचनांची पुस्तिका जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रसिध्द केली आहे.
दरम्यान रविवारी रात्री आलेल्या अहवालात 141 बाधित समोर आले असून सोमवारी रात्री उशिरा 10.15 वाजता आलेल्या अहवालात एन सी सी एस 50, आय आय एस ई आर 11,नारी 24 कृष्णा 29, अँटीजन टेस्ट ( RAT) 21, खाजगी लॅब 13 असे सर्व मिळून 148 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र सोमवारी रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित झाला. कारण 90 एवढय़ा मोठया संख्येने जिल्हय़ातील नागरिकांनी कोरोनावर मात करत लढय़ातील दिलासा जागृत ठेवला आहे.
जिल्हय़ात होम आयसोलेशन सुरू होणार
जिल्हय़ात कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याचे दिसत असले तरी दुसरीकडे कोरोनामुक्तीचे प्रमाणही चांगले आहे. कोरोनाच्या लक्षणांबाबतचा गोंधळही आता प्रशासनाने घेतलेल्या होम आयसोलेशनच्या निर्णयामुळे दूर होणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबतची मार्गदर्शिका प्रसिध्द केली आहे. ज्यांना कोणतेही लक्षणे नाही व ज्यांना सौम्य लक्षणे आहेत अशा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी घाबरुन न जाता घरात राहूनच आरोग्य विभागाच्या साथीने कोरोनावर मात करता येणार आहे.
जिल्हय़ातील 90 जणांची कोरोनावर मात
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 90 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये खंडाळा तालुका : रामबाग सिटी शिरवळ 37 वर्षीय पुरुष 14 वर्षीय बालक, तळेकर वस्ती 11 महिन्याची बालिका, सांगवी 19 वर्षीय तरुणी, नायगाव 7 वर्षीय बालक, शिर्के कॉलनी शिरवळ 34 वर्षीय पुरुष, स्टार सिटी शिरवळ 38 वर्षीय महिला, विंग येथील 44, 52, 23 वर्षीय पुरुष, जवळे 34 वर्षीय पुरुष.
कराड तालुका : शामगांव 60 वर्षीय महिला, सैदापूर 47 वर्षीय महिला 25 वर्षीय पुरुष, शेणोली 75 वर्षीय पुरुष, किवळ 65 वर्षीय पुरुष, 55, 34, वर्षीय महिला 13 वर्षीय बालिका, 10 वर्षीय बालक, कालेगाव 28, 65, 28 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, येवती 24 वर्षीय पुरुष, शामगाव 21 वर्षीय पुरुष 42 वर्षीय महिला, रविवार पेठ 42 वर्षीय पुरुष, म्हासोली 30 वर्षीय पुरुष, सैदापूर 62 वर्षीय पुरुष 56, 28 वर्षीय महिला व 8 वर्षीय बालिका, शामगाव येथील 38 वर्षीय पुरुष, श्रध्दा क्लिनिक 38 वर्षीय महिल। 41 वर्षीय पुरुष, शामगाव 33 वर्षीय महिला व 5 वर्षीय बालीका, किवळ 32 वर्षीय महिला, कासनी 38 वर्षीय महिला, गुरुवार पेठ, 27 वर्षीय महिला, कालवडे 6 वर्षीय बालक, शुक्रवार पेठ 38 वर्षीय पुरुष 6, 12 वर्षीय बालक 34 वर्षीय महिला, कालवडे 65 वर्षीय महिला.
सातारा तालुका : सातारा येथील यशवंत हॉस्पिटल येथील 34 वर्षीय महिला, अमर लक्ष्मी देगांव 38, 45 वर्षीय महिला 12 वर्षीय बालक 14 वर्षीय बालीका 52, 22 वर्षीय पुरुष, कण्हेर 45 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ 26, 53 वर्षीय महिला, 9 वर्षीय बालक 5, 5 वर्षीय बालीका 30 वर्षीय पुरुष, माची पेठ 30 वर्षीय पुरुष. खटाव तालुक्यातील वडुज येथील 66 वर्षीय पुरुष.
फलटण तालुक्यातील मलठण 3 वर्षीय बालिका, 22, 26, 60 वर्षीय महिला 37, 40 वर्षीय पुरुष, रिंग रोड 87, 50 वर्षीय पुरुष 77, 45, 38 वर्षीय महिला 16, 10 वर्षीय बालक, रामबाग कॉलनी येथील 62, 38 वर्षीय महिला 38 वर्षीय पुरुष 10 वर्षीय बालक. वाई तालुक्यातील शेंदूरजणे 38, 59, 35 वर्षीय महिला 15, 14, 12, 6 वर्षीय बलिका, 14 वर्षीय बालक, 34, 42 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
सातारा शहर व तालुक्यात रुग्ण वाढले
कराडमध्ये होणारी रुग्ण गंभीरच असून रविवारच्या अहवालात कराडमध्ये बाधित आढळून आले नाहीत. मात्र सातारा शहर व तालुक्यातील स्थिती गंभीर होवू लागलीय. सातारा तालुक्यात 55 नवीन बाधित आढळून आले असून यामध्ये शहरात शाहूपुरी उपनगरात एका दिवसात 15 तर तालुक्यातील सोनापूरमध्ये एका दिवसात 36 बाधित आढळून आले आहेत. कण्हेर, जिहे, चोरगेवाडी नंतर सोनापुरातील संसर्ग साखळी रोखण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. तर शाहूपुरीतील एकाच अपार्टमेंटमध्ये निर्माण होवू पाहणारी संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला कामाला लागले आहे.
सर्वांनीच नियम पाळण्याची गरज
एकीकडे कोरोनाचा कहर वाढत असताना त्यात कोरोनामुक्त होणारे दिलासा देत असले तरी संसर्ग होवूच नये व नवीन बाधित होवूच नयेत यासाठी सर्वांनीच नियम पाळून कोरोना विरुध्दच्या लढय़ात योगदान देण्याची गरज आहे. आता मार्केट सकाळी 9 ते 7 सुरु केले असून जिल्हय़ातील बाजारपेठांमध्ये अद्यापही व्यापाऱयांसह नागरिकांना शिस्तपालन आवश्यक आहे. ज्या आजाराबद्दल कोणीच काही ठोस सांगू शकत नाही त्यापासून लांब राहून त्याला हरवण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्यच केले पाहिजे.
हेल्मेटसक्तीला नागरिकांचा विरोध
एकीकडे लॉकडाऊनमुळे अनेकांचे वेतनही कमी झाले आहे तर बेरोजगारीमुळे आर्थिक अडचणी असताना जिल्हाधिकाऱयांनी दुचाकीवरुन प्रवास करताना हेल्मेट सक्तीचे केले आहे त्याला सर्वसामान्यांसह सर्वच नागरिकांचा विरोध आहे. मास्क, त्यावर हेल्मेट आणि दोन्हीही नसले की दंड हे अतिच होत असल्याची भावना असून मास्क आवश्यकच असून सध्या तरी निदान शहरात हेल्मेटसक्ती नकोच आहे. महामार्गावर दुचाकीवरुन प्रवास करताना हेल्मेट आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी मांडले आहे.
रविवारी रात्रीच्या अहवालात 141 बाधित
सातारा तालुक्यात शाहुपूरी 52, 46, 30, 38, 55, 62, 38 वर्षीय महिला 48, 37, 41, 62 वर्षीय पुरुष 18 वर्षीय तरुण 12 वर्षीय बालिका 3 वर्षीय बालक, गोडोली 43 वर्षीय पुरुष, करंजे 32 वर्षीय महिला, सोनापूर 32, 49, 65, 55, 31, 30, 48, 56, 24, 30, 50, 44, 34, 32 वर्षीय पुरुष 55, 40, 28, 38, 50, 26, 46, 62, 37, 27, 20, 40, 28, 60 वर्षीय महिला 18 वर्षीय तरुणी 3, 14, 11, 4, 16, 11, 11 वर्षीय बालक व एक पुरुष, क्षेत्र माहुली 50 वर्षीय महिला, वर्ये 31 वर्षीय महिला 18 वर्षीय तरुण. खटाव तालुक्यातील गारवाडी 45, 26 वर्षीय महिला 36, 45, 40 वर्षीय पुरुष व 19 वर्षीय तरुण, खबालवाडी 65 वर्षीय महिला, खटाव 40 वर्षीय पुरुष, 63, 40 वर्षीय महिला, मोळ 26 वर्षीय पुरुष, पुसेगाव 21 वर्षीय तरुण.
खंडाळा तालुक्यातील बावडा 30 वर्षीय पुरुष, शिरवळ 54 वर्षीय पुरुष 19 वर्षीय तरुणी 67 वर्षीय महिला, विंग 55, 30, 50 वर्षीय पुरुष 50, 45, 20, 32 वर्षीय महिला 2 वर्षीय बालिका, धनगरवाडी 41, 49 वर्षीय महिला 62 वर्षीय पुरुष. फलटण तालुक्यातील वाखरी 21 वर्षीय महिला, मंगळवार पेठ 55, 32, 75 वर्षीय महिला 55, 34, 50 वर्षीय पुरुष, मलटण 52 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 27, 36 वर्षीय महिला. तर आयसर पुणे यांच्याकडून प्राप्त 5 बाधितांचा अहवाल पुढील प्रमाणे 70, 38, 38 वर्षीय पुरुष 52, 54 वर्षीय महिला.
ऍन्टीजन चाचणी अहवालात 44 बाधित
सातारा जिह्यातील विविध खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या 44 रुग्णांचे (यामध्ये जावली येथील 1, शिरवळ 2, खटाव 3, कराड 1, सातारा 4, वाई 1, कोरेगांव 31 व माण 1) खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोविड बाधित असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.
561 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा 23, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड 85, उपजिल्हा रुग्णालय फलटण 29, वाई येथील 44, खंडाळा 86, पानमळेवाडी 27, मायणी 27, महाबळेश्वर 9, पाटण 55, दहिवडी 27, खावली 38 व कृष्णा हॉस्पिटल कराड 111 असे एकूण 561 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथे तपासणीस पाठवण्यात आले असल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 29930
एकूण बाधित 4561
एकूण कोरोनामुक्त 2218
मृत्यू 139
उपचारार्थ रुग्ण 2204
सोमवारी
एकूण बाधित 148
एकूण मुक्त 90
एकूण बळी 00
Previous Articleकराचीला स्वतंत्र प्रांत घोषित करण्याचा डाव
Next Article सांगली : कारागृहात उद्रेक, 62 कैदी पॉझिटिव्ह








