प्रतिनिधी / रत्नागिरी
गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येण्यासाठी पासची आवश्यकता असून विनापास कुणालाही जिल्ह्यात येता येणार नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सध्या मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या कशेडी घाटात रांगा लागल्या असून घाटात वादाचे प्रसंग घडत आहेत. आत्ताच काही वेळापूर्वी खेड येथे खोटा पास असलेल्या वाहनाला देखील पकडण्यात आले आहे. मात्र सध्या तरी विनापास जिल्ह्यात येण्याचा कोणताही निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला नाही अशी माहिती रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
गणेशोत्सवाला काही दिवस उरले असताना रविवारपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुंबईतुन येणाऱ्या चाकरमान्यांच्या गाड्यांची गर्दी सुरू झाली असून, विनापास जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनांकडून देण्यात आल्या आहेत, मात्र अजूनही शासनाकडून चाकरमानी संदर्भात कोणतेही नियमावली स्पष्ट करण्यात आले नसून याविषयी चाकरमानी मध्ये गोंधळ निर्माण झाला आहे, खोटे पास दाखवून जिल्ह्यात प्रवेश करू पाहणार्यावर प्रशासनाकडून रविवारी कारवाई करण्यात आली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









