1903 पासूनच्या प्रयोगाच्या वस्तू आजही सुस्थितीत
विशाल कदम / सातारा
जेव्हा शिक्षण म्हणजे काय हेच सामान्य नागरिकांना माहिती नव्हतं तेव्हा 1851 ला सातारा हायस्कूलची स्थापना केल्याचे सांगण्यात येते.पुढे याचे शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाला सुरुवात झाली.त्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये ब्रिटिश काळातली प्रयोगशाळा, प्रयोगशाळेतले प्रयोगाचे साहित्य एक अनमोल ठेवा आज ही जतन करून ठेवला आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहीप्रमाणे त्या ही वस्तू आज सुरक्षित आहेत.मुख्याध्यापक म्हणून कार्यभार घेतल्यावर सन्मती देशमाने यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले असून यावर्षी विद्यार्थ्यांचा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढले आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत शिकले ती शाळा म्हणजे प्रतापसिंह हायस्कूल. या शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबरच श्रीमंत अण्णासाहेब भोसले, श्रीमंत शाहू महाराज,पंतप्रतिनिधी भगवानराव श्रीनिवासराव, डॉ.ये.यस.आळतेकर,माजी न्यायाधीश डॉ.पी बी.गजेंद्रगडकर, प्राचार्य आर. डी.करमरकर यांच्यासह अनेक ज्ञानवंत शिकले.त्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून सध्या देशमाने हे कार्यभार पाहतात.गतवर्षी त्यांच्याकडे सूत्र आल्यानंतर त्यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे देता येईल यावर भर देणे सुरू केले.त्यामुळे यावर्षी दहावीच्या निकालात शाळेचा टक्का वाढला आहे.शाळेचा 100 टक्के निकाल लावण्याचा आणि शाळेचा पट वाढवण्यासाठी सातत्याने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.लॉक डाऊनच्या काळात तर दररोज ते प्रतापसिंह हायस्कूलमध्ये असतात.विद्यार्थ्यांना शाळेत काय कमी पडू नये, शाळा प्रवेश सुरू केला आहे.त्यांना शाळेत प्रयोगशाळा निर्दशनास आली.प्रयोगशाळेतील साहित्य 1903 सालापासूनचे असून ते आज ही सुस्थितीत आहे.आणखी ब्रयाच बाबी या शाळेत आहेत.









