महायुतीच्या दूधआंदोलनला पंढरपूरातून सुरूवात
चंद्रभागेत व नामदेव पायरीजवळ विठोबाला दुग्धाभिषेक
शुक्रवारी रात्रीच टायर जाळून आंदोलनाला हिंसक वळण
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर
दूध दरवाढीसाठी भाजपा महायुतीने पंढरपूरातून राज्यातील आंदोलनाला सुरूवात केली. यामध्ये येथील नामदेव पायरीजवळ विठोबाच्या मूर्तीस दुग्धाभिषेक घालून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी माजी मंत्री आमदार सदाभाउ खोत आणि महोदव जानकर यांनी आंदोलनाला सुरूवात केली. प्रसंगी सध्यांचे सरकार हे आंधळे, बहिरे आणि मुके असल्यांची टीका खोत यांनी केली.
भाजपा, रयतक्रांती आणि रासप कडून दूध दरवाढीसाठी आंदोलन सुरूवात करण्यात आले. यांचा प्रारंभ पंढरपूरात झाला. शनिवारी सकाळी सहा वाजता माजी मंत्री महादेव जानकर यांनी चंद्रभागेत विठोबाची मूर्ती ठेउन दुग्धाभिषेक करण्यात आला. तर सदाभाउ खोत यांनी सकाळी सात वाजता नामदेव पायरी येथे आंदोलन केले.
दूध आंदोलनाला सुरूवात होण्यापूर्वीच शुक्रवारी रात्री उशीराने आंदोलनाला हिंसक वळण आले. यामधे पंढरपूर-मंगळवेढा आणि पंढरपूर-सातरा रस्त्यावर टायर पेटवून देउन सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी दूधाला 10 रूपये अनुदान द्यावे. या मागणीसह आंदोलनकर्त्यानी सरकार विरोधी घोषणा देण्यास सुरूवात केली. खोत यांच्या आंदोलनाप्रसंगी रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले, प्रणव परिचारक, बळीराजा शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर, नितीन करंडे, दत्तात्रय मस्के आदी उपस्थित होते.
राज्यामध्ये रोज 1 कोटी 20 लाख लिटर दुधाचे संकलन होत आहे. 60 लाख लिटर दूध पिशवी बंदमध्ये विक्री होत आहे. 50 लाख लिटर दुध अतिरिक्त असून त्याची दूध भुकटी तयार केली जात आहे.2018 साली ज्यांनी आंदोलन केले ते आता सरकारमध्ये आहेत. आणि सध्यांचे सरकारमधील लोक देखिल राष्ट्रवादीशी संलग्न असणार्या दूध डेअरी मधील दूध संकलन करीत आहेत. आणि इतर लोकांना वा-यावर सोडत आहेत. त्यामुळेच सदरचे सरकार हे मुके, आंधळे आणि बहिरे आहे. त्यामुळे या सरकारला सदबुध्दी दे… असे पांडुरंगाकडे साकडे घातले असल्याची टीका खोत यांनी केली.
दुध दरासाठी पंढरीची वारी…
दूधाला दर देण्यासाठी सरकारने केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याची गरज नाही. एमएमआरडीए कडून पैसा उपलब्ध होउ शकतो. आणि शेतक-यांला सरकार खुश करू शकतो. फडणवीस सरकारने देखिल केंद्रांकडे पैसा न मागता शेतक-याना मदत केली होती. शेतक-यांच्या मदतीसाठी आता आपण विठठलाला धरून दुधादरासाठीची वारी करीत असल्यांचेही याप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार महादेव जानकर यांनी सांगितले.