प्रतिनिधी / कोल्हापूर
दुधाला प्रति लिटर ५ रुपये तर दूध पावडरला प्रति किलो ५० रुपये अनुदान मिळाव या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने शनिवारी आंदोलन करण्यात आले. राज्य शासनाच या विषयाकड लक्ष वेधण्यासाठी भाजपच्यावतीने महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद लाभला.
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला प्रति लिटर ५ रुपये आणि दूध पावडरसाठी प्रतिकिलो ५० रुपये अनुदान मिळाव ही भाजपची मागणी आहे. त्याकडे शासनाच लक्ष वेधण्यासाठी आज पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भाजपाच्या वतीन आंदोलन छेडण्यात आलं. पंचगंगा नदीच्या पुलावर जोरदार आंदोलन झाले.
राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलनाला सुरवात झाली. या आंदोलनात भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शोमिका महाडिक, भाजप किसान सेलचे अध्यक्ष भगवान काटे, जय शिवराय किसान मोर्चाचे अध्यक्ष शिवाजीराव माने रिपाईचे उत्तम कांबळे बलू पंत कुलकर्णी यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
अन्यथा आंदोलन तीव्र करणार – माजी खासदार धनंजय महाडिक यांचा इशारा
सर्व घटकांना जगणारा शेतकरीवर्ग समाधानी असला पाहिजे त्यांच्या पशुधनाला योग्य दर मिळाला नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी खासदार धनंजय महाडिक यांनी दिला.