बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर पोलिसांनी बंद झालेल्य नोटा विकणार्या आणि खरेदीदारांना कमिशन देण्याचे आमिष देणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे.
किरण कुमार (वय 32, रा. मगडी रोड, बी आर प्रवीण कुमार, मनसा नगर येथील आणि पवन कुमार, कलसीपल्यायम अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर बेंगळूरच्या जलाहल्ली येथील एका अपार्टमेंटमध्ये चलनात नसलेल्या 1000 रुपयांच्या नोटा असलेल्या ग्राहकांची वाट पाहत असताना त्यांना अटक केली.
या तिघांकडून पोलिसांनी 30 लाख रुपयांच्या जुन्या नोटा ताब्यात घेतल्या असून त्यांच्यावर फसवणूकीचा आणि विशिष्ट बँक नोट्स (दायित्वाचा अंत करणे) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









