मुंबई
भारतातील रेटिंग एजन्सी इक्राच्या सीईओपदी एन. शिवरामन यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी ते एल अँड टी कंपनीत कार्यरत होते. एल अँड टी कंपनीत त्यांना 34 वर्षाचा कामाचा गाढा अनुभव आहे. शिवरामन हे 10 ऑगस्ट 2020 रोजी पदभार स्वीकारणार आहेत. धोरण आखणे, व्यवसाय योजना बनवणे, संघटना बांधणी, भांडवलवृद्धी करणे, अधिग्रहण आणि गुंतवणूक याबद्दल त्यांच्या ज्ञानाचा फायदा इक्राला यापुढे होईल हे मात्र नक्की.









