बेंगळूर / प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णाची संख्या वाढतच चालली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५३२४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी १४७०रुग्ण एकट्या बेंगळूरमधील आहेत. तर राज्यात एकूण रुग्णांपैकी ४६.०२ टक्के रुग्ण हे बेंगळूर मधील आहेत.
राज्यात सलग पाचव्या दिवशी दररोज ५ हजाराहून अधिकरुग्णांची भर पडली आहे. त्याचबरोबर कर्नाटकमध्ये कोरोनाव्हायरसने सोमवारी तब्बल एक लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या २४ तासांत राज्यात ५३२४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.त्यामुळे प्रशासनाची वाढतच आहे.
आरोग्यविभागाच्या माहितीनुसार राज्यात कोरोनाच्या पहिल्या घटनेची नोंद ८ मार्च रोजी बेंगळूर येथे झाली होती. कर्नाटकात आतापर्यंत १,०१,४६५ हुन अधिक कोरोना बाधितांची नोंद झालीय आहे. त्यापैकी ४६.०२ टक्के रुग्ण बेंगळूरमधील असल्याचे म्हंटले आहे.









