दारूच्या बाटल्यांचा पडलाय खच, लॉकडाऊनमध्येदारूपिण्याचेटोळक्यांचेनवीनठिकाण
प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेने सदरबाजार येथे गतवर्षी कालव्याच्या दोन्ही बाजूस मोकळ्या जागेत बागा केल्या आहेत.या दोन्ही बागा शहराला उजाळा देणाया असल्या तरीही या बागेत लॉक डाऊनच्या काळात मध्यपींचा अड्डा बनला आहे.पाठीमागुन भिंतीवरून आत मध्ये जाऊन दारू पीत बसलेले असतात.दारूच्या बाटल्याचा खच पडलेला असून यावर प्रतिबंध करावा अशी मागणी होत आहे.दरम्यान, नगरसेवक विशाल जाधव यांच्याशी संपर्क साधला असता संरक्षण भिंत उंच करण्यासाठी प्रस्तावित काम आहे, असे सांगितले.
सदरबाजार परिसरात गतवर्षी पालिकेने लाखो रुपये खर्च करून नविन बागा करण्यात आल्या आहेत.खासदार उदयनराजे यांच्या हस्ते त्या बागांचे उद्घाटन करण्यात आले.नागरिकांसाठी त्या बागा गतवर्षी खुल्या करण्यात आल्या.या बागा चांगल्या असल्या संध्याकाळी या परिसरातील नागरिकांना, बाल चम्मूना सोय झाली आहे.मात्र, लॉक डाऊनच्या काळात या बागा बंद आहेत.गेट बंद आहे. परंतु मध्यपींना पाठीमागून संरक्षण भींतीवरून आतमध्ये उतरून दारूच्या पाटर्य़ा झडत असतात.दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे.याबाबत नगरसेवक विशाल जाधव यांना विचारणा केली असता बागेची संरक्षण भिंतीची उंची वाढवण्याचे काम करण्यात येणार आहे.ते काम प्रस्तावित आहे, असे सांगितले.









