ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात रविवारी दिवसभरात 9431 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 75 हजार 799 वर पोहचली असून, मृतांचा एकूण आकडा 13 हजार 656 एवढा आहे.
आज दिवसभरात 6044 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 2 लाख 13 हजार 238 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 1 लाख 48 हजार 601 रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात 267 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यू दर 3.63 % आहे. तर कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 56.74 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 18 लाख 86 हजार 296 नमुन्यांपैकी 3 लाख 75 हजार 799 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9 लाख 08 हजार 420 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 44 हजार 276 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.