प्रतिनिधी / खंडाळा
खंडाळा तालुक्यातील केसुर्डी येथील कडजाई शिवारात ढगफूटीने सुमारे पन्नास एकर क्षेत्रावरील बाजरी पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे चिंता व्यक्त करित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बळीराजाने केली आहे.
शुक्रवारी दुपारी तालुक्यात कमी -अधिक पाऊस झाला. मात्र केसुर्डी येथे कडजाई नावाच्या शिवार परिसरात जोरदार वारा आणि ढगफुटीमुळे सुमारे पन्नास एकर क्षेत्रावरील फुलोऱ्यात आलेल्या बाजरी पिकासह मुग आदी कडधान्य भुईसापट झाली. दरम्यान, खंडाळा विभागाचे मंडल अधिकारी सूरज पोळ, कृषी सहाय्यक प्रमोद खंडागळे यांनी शिवारात भेट देवून बाजरी पिकाची पाहाणी करित पंचनामा केला आहे. तर चिंता व्यक्त करित शासनाने पंचनामा करून भरपाई मिळावी अशी मागणी बळीराजाने केली आहे.
नुकसान भरपाई द्यावी अन्यथा रस्त्यावर उतरू” – प्रमोद जाधव-जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना किसान मंच सातारा.
“कोरोना महामारीने शेतकरी अडचणीत आला आहे. गेली उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात नासुन चालला असून भांडवल सुध्दा निघाले नाही.आता हि आपत्ती. त्यामुळे सगळीकडून शेतकरी याची लुट होत असते तरी या अडचणीत योग्य नुकसान भरपाई द्यावी अन्यथा रस्त्यावर उतरू”