दिवसभरात सात जणांचा बळी
एकूण रुग्ण संख्या झाली 6 हजार 834
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहरात शुक्रवारी 127 तर ग्रामीण भागात 108 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. एकूण 235 रुग्णसंख्या झाली. शुक्रवारी शहरात 1 तर ग्रामीणमध्ये 6 जणांचा बळी गेला. एकूण रुग्णसंख्या 6 हजार 834 एवढी झाली आहे.
सोलापूर शहरात शुक्रवारी 127 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. बरे झाल्याने तब्बल 185 जणांना घरी सोडण्यात आले, तर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी दिली.
सोलापूर शहरात शुक्रवारी 1 हजार 350 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 127 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 1 हजार 223 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 127 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 75 पुरुष तर 52 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 हजार 305 झाली आहे. तसेच उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू झाला.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती ः 23929
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती ः 4305
प्राप्त तपासणी अहवाल ः 22593
प्रलंबित तपासणी अहवाल ः 336
निगेटिव्ह अहवाल ः 18288
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या ः 338
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या ः 1481
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या ः 2486
ग्रामीण भागात 108 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण
सोलापूर जिह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी 108 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर 6 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 112 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी शुक्रवारी दिली.
जिह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी 641 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 108 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 533 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 108 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 59 पुरुष आणि 49 स्त्रियांचा समावेश आहे. जिह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 हजार 528 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती ः 19077
ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती ः 2528
प्राप्त तपासणी अहवाल ः 1898
प्रलंबित तपासणी अहवाल ः 96
निगेटिव्ह अहवाल ः 16453
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या ः 63
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या ः 1621
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या ः 846









