कोल्हापुरातील गंगावेश तालमीत गिरवले होते कुस्तीचे धडे
ऑनलाईन टीम
जगप्रसिद्ध मल्ल सादिक पंजाबी यांचे पाकिस्तानात राहत्या घरी आज, बुधवारी निधन झाले. मातीवरील कुस्तीत सादिक यांनी नावलौकीक मिळवला होता. कोल्हापूरच्या मातीची त्यांची खास नाळ जोडली होती. १९६० च्या दशकात ते कोल्हापुरातील शाहू विजयी गंगावेश या तालमीत कुस्तीचे धडे गिरवत होते. त्यांच्या निधनाने कोल्हापुरातील मल्ल क्षेत्रातून पुन्हा एकदा उजाळा मिळाला .
भारतातून पाकिस्तानला परतल्यावर लाहोरमधल्या आखाड्यात ते पैलवानांना माती व मॅटवरील कुस्तीचे धडे देत होते. आयुष्यात एकदा पुन्हा कोल्हापुरात येऊन रंकाळ्यावर फिरायचे आहे, अशी इच्छा होती. त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली. त्यांचा मुलगा सज्जन पंजाबी हा पैलवान असून, तोही पैलवानांना मार्गदर्शन करतो. एक देखना अन् मोठ्या जोडीतला मल्ल म्हणुन त्यांची ख्याती होती. भारतात तसेच कोल्हापुरात त्यांना खुप प्रेम मिळाले. अचानक त्यांच्या जाण्याने कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








