सांगली / प्रतिनिधी
कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही ,हे जगात सगळीकडे सिद्ध झालेले आहे. अँटिजेंन चाचणी वाढवणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नीट करणे, नियमांचे काटेकोर पालन करणे या उपाययोजना ऐवजी जनतेसमोर असंख्य आर्थिक अडचणी निर्माण करणारा निरुपयोगी लॉक डाउन करून काहीही साध्य होणार नाही. कोरोनाला थोपवण्याच्या उपाययोजना करण्यापेक्षा निरनिराळ्या गोष्टींतून पैसे कसे काढता येतील यावर प्रशासनाचे लक्ष असल्याचे दिसून येते आहे. यामुळे सांगली प्रशासनाने कोणाला विश्वासात न घेता घोषित केलेल्या लॉकडाऊनला सांगली जिल्हा सुधार समितीचा तीव्र विरोध आहे. हा लॉकडाऊन तात्काळ रद्द करण्यात यावा , अशी मागणी यावेळी समिती अध्यक्ष अॅड.अमित शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.








