प्रतिनिधी / गोकुळ शिरगाव
कणेरीवाडी ता. करवीर येथील कोणतेही तरुण गणेश मंडळ यावर्षी मंडळाचा गणपती बसवणार नसून गणपतीसाठी मंडळांचा जो खर्च होणार आहे. त्याचा सर्व निधी विद्या मंदिर कणेरीवाडी सुशोभिकरणासाठी वापरला जाईल असा निर्णय मंगळवारी सकाळी झालेल्या बैठकीत सर्व ग्रामस्थांनी मिळून घेतला.
सध्या कोरोनाव्हायरस ने राज्यात धुमाकूळ घातला असून याचे पडसाद कोल्हापूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे गर्दी करणे हे आता जोखमीचे झाले आहे .यासाठी आज कणेरवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र जमून गावांमध्ये यावर्षी मंडळांचा होणारा गणेशोत्सव साजरा न करता यातून मंडळाची जी खर्च होणारी रक्कम आहे ती रक्कम कणेरीवाडी येथील विद्या मंदिर चे सुशोभीकरणाचे काम चालू आहे व शाळेसमोर उद्यान बांधण्याचे सुद्धा काम चालू आहे .त्यासाठी गावातील सर्व तरुण मंडळ गणपतीत होणारा खर्च थांबूऊन या शाळेतील कामासाठी देणार असल्याचे सुद्धा या बैठकीत ठरले. या बैठकीला सरपंच. उपसरपंच. सदस्य. गावातील विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी, तरुण मंडळाचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती या ठिकाणी या बैठकीला उपस्थित होते.