बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोन बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच राज्यत काही ठिकाणी आरोग्य सेवा व्यवस्थित मिळत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. यातच रुग्णांना खाजगी रुग्णवाहिका पुरविल्याच्या तक्रारी वाढत आहेत, कर्नाटक परिवहन विभागाने अद्याप आपत्कालीन वाहनांचे भाडे निश्चित केलेले नाही. बीबीएमपीकडे टेंपो ट्रॅव्हलर्ससह सुमारे ६५० रुग्णवाहिका आहेत. तथापि, बर्याच लोकांना सेवा उपलब्ध होत नसल्यामुळे अवघड होत आहे, जी लोकांसाठी विनामूल्य आहे. पण विनामूल्य रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने बऱ्याचदा रुग्णांची गैरसोय होत आहे.
एका 55 वर्षीय कोविड रूग्णाचे नुकतेच निधन झाले. त्या रुग्णाला रूग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही. यावेळी त्या रुग्णाला घेऊन जाण्यास चौघांनी नकार दिला, पण तेथे आलेल्यांनी अटीगुप्पे ते जयनगर पर्यंतच्या दहा किमीच्या प्रवासासाठी तब्बल १५००० रुपयांची मागणी केली. एकीकडे नागरिक संकटात असताना दुसरीकडे मात्र रुग्णांची लूट होताना पाहायला मिळत आहे.
अजूनही राज्य परिवहन विभागाने रुग्णवाहिका शुल्क नियमित करण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत आणि वाहनांविरूद्धच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. परिवहन विभागाचे अतिरिक्त आयुक्त आणि राज्य परिवहन प्राधिकरणाचे सचिव एल. हेमंत कुमार यांनी आत्तापर्यंत रुग्णवाहिकांसाठी भाडे निश्चित करण्याची आमची कोणतीही योजना नसल्याचे म्हंटले आहे.