प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरानाबाधितांची वाढती संख्या चिंतेची बाब ठरत आहे. रविवारी दिवसभरात 4120 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 63772 वर पोहोचली आहे. दरम्यान, मागील 24 तासांमध्ये 91 रुग्णांचा बळी गेल्यामुळे मृतांचा आकडा 1331 वर पोहचला आहे. दिवसात 1290 जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत 23065 बरे झाले आहेत. तर 39370 बाधितांवर सध्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री के. सुधाकर यांनी दिली. मागील 24 तासांत बेंगळूरमध्ये सर्वाधिक 2156 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.









