वार्ताहर / सिद्धनेर्ली
बामणी (ता कागल) येथील एक २५ वर्षीय तरुणीचा अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. व्हन्नूर नंतर बामणी मध्ये आठ दिवसाच्या अंतरात चौथा रुग्ण सापडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे व्हन्नूर मधील कोरोना बाधित कोल्हापूर मधील ज्या दवाखान्यात कामाला होते. त्याच दवाखान्यात ही तरुणी सुद्धा कामाला जात होती. या दवाखान्यातील डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे या सर्वांना कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान बामणी येथे ही तरुणी ज्या परिसरात राहते.
तो संपूर्ण परिसर पोलीस ग्रामपंचायत व आरोग्य विभागामार्फत सील करण्यात आला आहे. संपूर्ण गाव आठ दिवसासाठी बंद करण्यात आले आहे. या तरुणीच्या घरातील पाच जणांना होम क्वारंटाईन केले आहे. तसेच घरातील व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या चाळीसहून अधिक व्यक्तींना पूर्व काळजी म्हणून घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना आरोग्य विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









