प्रतिनिधी कोल्हापूर
जिह्यामध्ये कोरोनाचा उद्रेक सुरुच असून रुग्णांच्या संख्येत तासागणीक भर पडत आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून शनिवारी दुपार पर्यंत जिह्यात नव्या 240 रुग्णांची भर पडल्याने कोरोनाबाधितांचा आकडा 2091 वर पोहोचला आहे. दरम्यान कबनूर (ता. हातकणंगले) येथील 72 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.कोल्हापूर जिह्यात सलग दुसऱया दिवशी दोनशेहून अधिक रुग्णांची भर पडली. कोरोना रुग्णांच्या चाचणीसाठी प्रथमच जिह्यात अँटीजेन टेस्टचा वापर करण्यात आला आहे. शिरोळ, इचलकरंजी, चंदगड या हॉटस्पॉटमध्ये या टेस्टचा वापर केला जात आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार नव्या 48 रुग्णांची भर पडली.
इचलकरंजी येथील 10
हातकणंगले तालुक्यामध्ये 8 रुग्ण पेशंट आढळून आले. यामध्ये हुपरी 5, रेंदाळ 1, हातकणंगले 2
राधानगरी तालुक्यामध्ये गुडाळ 3, चाफोडी 1, तुरंबे 1, चंद्रेश्वर 1, तरसंबळे 1
कोल्हापूर शहर येथील खरी कॉर्नर 1, शिवाजी पेठ 1, शाहूनगर 1, भोसलेवाडी 1, वारे वसाहत 1, कोल्हापूर 3 पन्हाळा








