प्रतिनिधी / संगमेश्वर
धामापूर भायजेवाडी येथील बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. यश रवींद्र महाडिक 22 वर्षे आणि विजय विश्वास भालेकर 21वर्षे या दोघांचा मृत्यू झाला आहे.
धामापूर भायजेवाडी येथील पाणलोट मधून बंधारा बांधण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे हा बंधारा भरून वाहत आहे. धामापूर पीर येथील पाच जण शनिवारी दुपारी पोहायला गेले होते. यापैकी यश महाडिक आणि विजय भालेकर या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस निरीक्षक उदय झावरे आणि पोलीस घटनास्थळी गेले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








