@ प्रतिनिधी/ बेळगाव
देशाची घटना लिहिणाऱया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुबई येथील राजगृहाची तोडफोड करणाऱयांवर कारवाई करा. याचबरोबर यापुढे अशा घटना घडल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा विविध दलित संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन निवेदनाद्वारे दिला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली. बांद्रा येथे त्यांचे राजगृह आहे. त्या ठिकाणी अचानकपणे काही विघ्नसंतोषींनी हल्ला केला. या राजगृहाच्या खिडक्मया फोडल्या, तसेच इतर फुलांच्या कुंडय़ांचे नुकसान देखील केले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे फोडले आहेत. ही अत्यंत निषेधार्थ घटना आहे. या घटनेतील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी दलित संघटनांनी केली आहे.
अशाप्रकारे दलितांवर जर हल्ले होत असतील तर आम्ही कदापीही गप्प बसणार नाही. आम्हाला कोणीही कमी समजू नये. आमच्यावर किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द किंवा अनुचित प्रकार केल्यास त्यांना आम्हीच धडा शिकवू, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
या निवेदनावर दुर्गेश मेत्री, गजानन देवरमनी, के. डी. मंत्रेशी, मल्लेश चौगुले, गुंडू तळवार, रमेश कोलकार, अर्जुन देमट्टी, लक्ष्मण कोलकार, दीपक मेत्री, सुनील मोरे, जीवन कुरणे, मनोहर मुचंडी यांच्यासह इतर कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत..









