लॉस एंजिल्स
अमेरिकेची माजी टॉप सिडेड महिला टेनिसपटू तसेच 23 ग्रॅन्डस्लॅम विजेती सेरेना विल्यम्स ऑगस्ट महिन्यात होणाऱया डब्युटीए टूरवरील केन्चुकी महिलांच्या टेनिस स्पर्धेत आपले पुनरागमन करणार आहे. सदर स्पर्धा पहिल्यांदाच भरविली जात असल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितले.
सदर स्पर्धा 10 ऑगस्टपासून खेळविली जाणार असून सेरेना विल्यम्स आणि 2017 सालातील अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम विजेती अमेरिकेची स्लोअन स्टिफेन्स या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण राहिल. गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या फेडरेशन चषक टेनिस स्पर्धेत सेरेनाने अमेरिकेचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यानंतर कोरोना महामारीमुळे सर्व टेनिस स्पर्धा स्थगित किंवा लांबणीवर टाकण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने घेतला होता. येत्या ऑगस्ट महिन्यात पुरूषांच्या एटीपी टुरलाही प्रारंभ होणार आहे. अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेला न्यूयॉर्कमध्ये 31 ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे.









