रिलायन्स -एचडीएफसी बँक तेजीत : सेन्सेक्सची 548 वर झेप
वृत्तसंस्था/ मुंबई
शेअर बाजाराचा तेजीचा प्रवास सप्ताहातील अंतिम दिवशी शुक्रवारी सेन्सेक्स 500 चा टप्पा पार करुन 37,000 हजारचा उच्चांक पार करत 37,020.14 वर बंद झाला. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि हिंदुस्थान युनिलिव्हरच्या यांच्या समभागांच्या कामगिरीमुळे बाजाराला तेजी प्राप्त करण्यास यश मिळाले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या बीएसई सेन्सेक्सने प्रारंभीला तेजीने सुरुवात केली होती. दिवसअखेर सेन्सेक्स 548.46 अंकांनी वधारुन निर्देशांक 37,020.14 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 161.75 अंकांनी वधारुन निर्देशांक 10,901.70 वर स्थिरावला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये शुक्रवारी सर्वाधिक तेजीत ओएनजीसीचे समभाग 5.52 टक्क्मयांनी वधारल्याचे पाहायला मिळाले. अन्य कंपन्यांमध्ये टायटन, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि बजाज फायनान्सचे समभाग वधारले. मात्र टीसीएस, नेस्ले इंडिया, इन्फोसिस, एचसीएल टेक आणि ऍक्सिस बँक यांच्या समभागांमध्ये घसरण झाली.
जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये जागतिक बाजाराचे सकारात्मक संकेत राहिले होते. याचा लाभ भारतीय शेअर बाजाराला झाला. अन्य शेअर बाजाराच्या तुलनेत चीनचा शांघाय, हाँगकाँग आणि दक्षिण कोरियाचा सोल बाजार तेजीत राहिला होता. युरोपमधील जर्मनी आणि ब्रिटनचा बाजार तेजीत राहिला परंतु फ्रान्सचा घसरला. आंतरराष्ट्रीय तेल मानांकन ब्रेंट क्रूडचा वायदा भाव 0.97 टक्क्मयांनी घसरुन 42.95 डॉलर प्रति बॅरलवर राहिला.









