प्रतिनिधी / सोलापूर
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याचे प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. परंतू या सर्वसाधारण सभेमध्ये अतिशय महत्वाचे विषय अजेंडावर असून त्याची चर्चा सभागृहामध्ये व अधिकाऱ्यांसमोर होणे आवश्यक आहे. त्यामूळे सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्स ऐवजी हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये घ्यावी, अशी मागणी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे सर्वपक्षीय गटनेत्यांनी गुरुवारी केली आहे.
सर्वपक्षीय गटनेत्यांनी गुरुवारी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेत सदरची मागणी केली. यामध्ये माजी सभागृह नेते सुरेश पाटील, कॉंग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव, एम आय एम चे गटनेते रियाज खैरादी यांचा समावेश आहे.
कोरोनामुळे महापालिकेची सर्वसाधरण सभा गेली चार महिने घेण्यात आलेली नाही. जुलै महिन्याची सर्वसाधरणसभा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याचे शासनाचे आदेश आहेत. परंतू या सभेला काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, एम. आय. एम. व भाजप नगरसेवकांनी यापूर्वी विरोध कळवला आहे. सर्व गटनेत्यांचे म्हणणे आहे की, मनपा आयुक्त नवीन असल्यामुळे अधिकारी व नगरसेवकांची बाजू समजून घेऊन सोलापूर शहराच्या विकासाच्या संदर्भात माहिती देणे गरजेचे आहे. त्यामूळे ही सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न घेता हुतात्मा स्मृती मंदिर याठिकाणी घेण्यात यावी.
तसेच सोलापूर महानगरपालिकेचे जुने सभागृह तोडून त्या ठिकाणी आयुक्तांचे कार्यालय करत असल्याची बाब अतिशय चुकीची व गंभीर आहे.आप्पासाहेब काडादी यांचा वारसा असणारे सभागृह दुरुस्त करुन तेथे आयुक्तांचे दालन करने अतिशय चुकीची गोष्ट आहे. जुने सभागृह हे सोलापूर शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या जुन्या नेत्यांची एक अस्मिता असून ते तोडून तिथे कार्यालय करणे योग्य नाही, याबद्दल सर्व गटनेत्यांनी आक्षेप घेतला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








