काय बंद, काय चालू …सविस्तर जाणून घ्या
तरुण भारत संवाद प्रतिनिधी/बार्शी
कोरोना विषाणूचा प्रसार बार्शी आणि वैराग शहरांमध्ये जलद गतीने थांबावा आणि कोरोना विषाणूची साखळी तुटावी यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी यांनी दिनांक 16 जुलै च्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते दिनांक 26 जुलै रात्री बारा वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू केली आहे. मात्र या संचारबंदी मध्ये कोणत्या सुविधा चालू राहणार आणि कोणत्या बंद राहणार याचे सविस्तर आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत त्या अगदी सोप्या भाषेत दैनिक तरुण भारत संवाद वाचकास देत आहे.
हे बंद राहणार-
सर्व किराणा दुकान, सर्व प्रकारचे किरकोळ ठोक विक्रेते, कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद, दोन शहरातील सर्व रेशन दुकाने बंद, राज्य शासन, केंद्र शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि कोरोणा शी संबंधित असणारी कार्यालय सोडून सर्व कार्यालय बंद, क्रीडांगणे मोकळ्या जागा उद्याने बगीचे मॉर्निंग वॉक संपूर्ण बंद, फळ मार्केट भाजी मार्केट आठवडी बाजार बंद, मटन चिकन अंडी मासे विक्री पूर्ण बंद, शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था प्रशिक्षण संस्था शिकवणी वर्ग पूर्ण बंद , सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहने दोन चाकी तीन चाकी चार चाकी की संपूर्ण बंद, सर्व प्रकारचे बांधकामाची कामे बंद , चित्रपट ग्रह जलतरण तलाव नाट्यग्रह बार सभागृह मंगल कार्यालय हॉल लग्नसमारंभ स्वागत समारंभ संपूर्ण बंद , सर्व खाजगी कार्यालय बंद सर्व प्रकारचे मनोरंजन राजकीय सामाजिक क्रीडा धार्मिक कार्यक्रम आणि सभा बंद, सर्व राष्ट्रीयीकृत आणि आरबीआयने मान्यता दिलेल्या बँका सहकारी बँका नागरिकांसाठी बंद.
हे चालू राहील-
दूध वाटप आणि दूध विक्री चालू राहील मात्र फक्त सकाळी सहा ते नऊ या वेळेत करावी आणि एका ठिकाणी उभा राहून विक्री करता येणार नाही, खाजगी आणि सार्वजनिक सर्व दवाखाने, पशु चिकित्सा केंद्र चालू राहतील, मेडिकल दुकाने चष्म्याची दुकाने त्यांच्या नियमित वेळेनुसार चालू राहतील ,कायदेशीर कर्तव्य बजावणारे अधिकारी-कर्मचारी उदाहरण आरोग्य महसूल पोलीस पाणीपुरवठा विद्युतपुरवठा अग्निशमन असे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अधिकारी यांना ओळख पत्राद्वारे परवानगी राहील, गॅस पाणीपुरवठा आरोग्य स्वच्छता इतर अत्यावश्यक कर्मचारी यांना दुचाकी वापरण्यास परवानगी मात्र दुचाकीवर एकच व्यक्ती असणे बंधनकारक आणि ओळखपत्र बंधनकारक, अत्यावश्यक आणि शासकीय कर्मचारी यांना त्यांच्या कार्यालयीन वेळेतच परवानगी, पोस्ट कार्यालय चालू राहील , गॅस पुरवणाऱ्या एजन्सी चालू राहतील मात्र गॅस फक्त घरपोच दिला जाईल , कृषी व कृषी विषयक दुकाने जसे बी बियाणे खते कीटकनाशके औषधे चारा अशी दुकाने चालू राहतील मात्र सकाळी आठ ते दोन वाजेपर्यंत, पत्रकार आणि त्यांची कार्यालय चालू राहतील मात्र ओळखपत्र बंधनकारक, पेट्रोल पंप चालू सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत पंप चालू राहतील मात्र पेट्रोल आणि डिझेल यांचा पुरवठा फक्त वैद्यकीय सेवा ,अत्यावश्यक सेवा ,शासकीय कर्मचारी आणि पत्रकार यांच्या वाहनांना करता येईल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








