वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (बीसीसीआय) हेमांग अमीन यांची हंगामी सीईओपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली. माजी सीईओ राहुल जोहरी यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा आदेश बीसीसीआयने यापूर्वी दिला होता. तो मंडळाने स्वीकारला आहे.
गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळामध्ये हेमांग अमीन यांनी बरेच परिश्रम घेतले आहेत. त्यांची सीईओ पदावर हंगामी स्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे. अमीन हे प्रामाणिक आणि परिश्रम घेणारे व्यक्तीमत्त्व म्हणून ओळखले जातात. मंडळाच्या प्रायोजक करारातील गुप्त माहिती बाहेर पडल्याने राहुल जोहरी यांची उचलबांगडी निश्चित झाली होती. हेमांग अमीन हे आयपीएल स्पर्धेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आहेत. गेल्यावर्षी आयपीएल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभानंतर हेमांग अमीन यांनी पुलवामा हल्ल्यात बळी पडलेल्या जवानाच्या कुटुंबियासाठी मदतनिधी देण्याचा निर्णय घेतला होता.









