चिकोडी विभागाचा निकाल 63.88 टक्के
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनामुळे रखडलेला बारावीचा निकाल अखेर पदवीपूर्व शिक्षण खात्याने मंगळवारी जाहीर केला. बेळगाव विभागाचा निकाल 59.7 तर चिकोडी शैक्षणिक विभागाचा 63.88 टक्के निकाल लागला आहे. राज्यात चिकोडीचा 20 वा क्रमांक तर बेळगावचा 27 वा क्रमांक लागला आहे. मागील वषीच्या तुलनेत यावषी बेळगाव व चिकोडी या दोन्ही शैक्षणिक जिल्हय़ांच्या टक्केवारीत वाढ झाल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
मंगळवारी सकाळी 11.30 वा. पदवीपूर्व शिक्षण खात्याने ऑनलाईन निकाल जाहीर केला. यामध्ये उडुपी जिल्हा प्रथम क्रमांकावर, दक्षिण कन्नड द्वितीय तर कोडगु जिल्हा तृतिय क्रमांकावर आहे. राज्यात एकूण 61.80 टक्के बाराविचा निकाल लागला. कला शाखेचा 41.27, वाणिज्य शाखा 65.52, विज्ञान शाखेचा 76.2 टक्के निकाल लागला.









