वार्ताहर / जमखंडी
बागलकोट जिल्हय़ात रविवारी दि. 12 रोजी आणखी 7 जणांना कोरोना बाधा झाल्याचे आढळून आले असून बाधित संख्या 399 झाली असल्याचे जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. के. राजेंद्र यांनी कळविले आहे.
बागलकोट जिल्हय़ातील जमखंडीतील एका खासगी डॉक्टरांना 45 वर्षाच्या कोवीड बाधा झाली. रुग्ण क्रमांक 28989 च्या संपर्काने या डॉक्टरांना (रुग्ण क्रमांक 36407) बाधा झाली. बागलकोट विनायकनगर येथील 65 वर्षाच्या रुग्ण क्रमांक 36422, सीमीकेरी येथील 47 वर्षाच्या पुरुषाला रुग्ण क्रमांक 36430, बिळगी तालुक्यातील जानमट्टी येथील 70 वर्षाच्या वृद्धाला रुग्ण क्रमांक 36366, नवनगर सेक्टर क्रमांक 54 मधील 47 वर्षाच्या रुग्ण क्रमांक 36390, बागलकोट शहरातील 50 वर्षाच्या पुरुषाला रुग्ण क्रमांक 36399, बदामी तालुक्यातील कुळगेरी येथील 37 वर्षाच्या पुरुषाला कोरोना बाधा झाली. अद्याप 2206 नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. आतापर्यंत 17244 नमुने प्रयोग शाळेला पाठविण्यात आले. त्यापैकी 14537 निगेटीव्ह, 399 पॉझिटिव्ह, 12 मृत्यू, 183 कोरोना मुक्त, 199 रुग्णावर उपचार सुरु आहेत. कंटेन्मेंट झोन 34 आहेत.









