मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मोलाची कामगिरी केली आहे. आता येथील दिग्दर्शक आशिष निनगुरकर यांच्या नियम तसेच कुलूपबंद या लघुपटांनी वेगळीच भरारी घेतली आहे. परदेशातील उद्योजक फेड्री रिगन यांच्या वर्ल्ड ग्लोब संस्थेअंतर्गत या लघुपटांचा खास प्रीमियर पॅनडामध्ये होणार आहे. ग्रामीण भागात राहून टाळेबंदीच्या काळात तयार केलेल्या सामाजिक लघुपटांची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आल्याने या टीमचे विशेष कौतुक होत आहे.
नियम आणि कुलूपबंद या लघुपटांची निर्मिती काव्या ड्रीम मुव्हीज अंतर्गत किरण निनगुरकर यांनी केली असून या लघुपटांमध्ये अशोक निनगुरकर, जयश्री निनगुरकर, स्वरूप कासार आणि अनुराग निनगुरकर यांनी भूमिका साकारल्या आहेत. अभिषेक लगस यांनी या लघुपटांचे संकलन केले आहे. पॅमेरामन, संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन अशी चौफेर धुरा आशिष निनगुरकर यांनी सांभाळली आहे. वर्क फ्रॉम होमच्या काळात ग्रामीण भागातील कलाकाराने घरात राहून सामाजिक आशय मांडणाऱया या लघुपटांना आता परदेशात गौरविण्यात येणार असल्याने त्यांच्या टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.









