प्रतिनिधी / सातारा
कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेली ४० वर्षीय महिला कोरोनाबाधित झाली आहे. त्यामुळे कोडोलीतला ती रहात असलेला परिसर मायक्रो कंटेंटमेंट झोन सातारा प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार कोडोलीच्या स्वागत कमानीपासून ते विठ्ठल मंदिर अशी सीमा आहे.पूर्वेस प्रकाश जाधव यांचे घर तर उत्तरेला भोसले कॉलनीचा रस्ता, दक्षिणेकडे राजेंद्र भोईटे यांचे घर असा कंटेंटमेंट झोन करण्यात आला आहे.








