प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या कायम आहे. आज, रविवारी आणखी 18 रुग्णांची भर पडली. यामुळे कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कोरोनाची ही वाढती साखळी मोडण्यासाठी नागरिकांनी आता सतर्क राहण्याची गरज आहे. तर या वाढत्या संख्येमुळे जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
आज, दुपारी 3.30 वाजेपर्यंत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील 6 रुग्णांचा समावेश आहे. यात राजाराम चौक येथे 04, मंगळवार पेठेत 01, राज्योपाध्येनगरात 01 रुग्ण आढळून आला आहे. तर करवीर तालुक्यातील वळीवडे व गांधीनगरात प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. इचलकरंजी येथे 04, चंदगड शिनोलीत 02, गडहिंग्लज येथे 2 तर कानडेवाडी व शेंद्री येथे प्रत्येकी 01 रुग्ण आढळला.
तर आता सायंकाळी आलेल्या अहवालानुसार आणखी १८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आज दिवसभरात ३७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या ३७ जणांसह जिल्ह्यातील कोरोना रग्णांची संख्या आता १२१८ वर पोहोचली आहे. १२१८ मधील दहा कोरोनाबाधितांची प्रकृती गंभीर आहे. आता पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये कोल्हापूर शहर सहा, इचलकरंजीचे दहा, शिरोळ एक तर ओरिसाच्या एकाचा समावेश आहे.