ऑनलाईन टीम / मुंबई :
राजभवनातील 18 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. बाधितांमध्ये दोन वरिष्ठ अधिकारी आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.
राज्यपालांचे कार्यालय आणि निवासस्थान असलेल्या राजभवनातील जवळपास शंभर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामधील 18 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. हे सर्व कर्मचारी राजभवन परिसरातील क्वॉर्टर्समध्ये राहतात. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची आता कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
पहिल्यांदा राजभवनातील इलेक्ट्रिशियनला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर इतरांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्यपालांची प्रकृती स्थीर असल्याचे सांगण्यात येते.









