तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
शहरातील बहुतांश भागामध्ये शिरकाव केलेल्या कोरोनाने ग्रामीण भागात पाय पसरत चांगलाच विळखा घट्ट केला आहे. यामुळे नागरिक भयभीत होत असून, शहरात 86, तर ग्रामीण भागामध्ये 107 नवे रुग्ण आढळून आले. शहरात दोघांचा मृत्यू झाला आहे.
शहरात 216 जणांपैकी 86 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर 130 निगेटिव्ह रुग्ण आढळले. प्रकृतीत सुधारणा झाल्याने 51 जणांना घरी सोडल्याचे प्र. आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी सांगितले. ग्रामीण भागात शनिवारी 71 पुरुष, तर 36 महिला असे 107 कोरोना बाधित रुग्ण आढळले. आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला असून, एकूण 817 रुग्ण झाले आहेत. उर्वरित 446 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी जमादार यांनी सांगितले. उत्तर सोलापूर, मोहोळ माळशिरस, माढा, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर बार्शी तालुक्यात आढळले आहेत. 337 जण बरे होऊन घरी गेले आहेत.
शहरातील संख्या
एकूण तपासणी- 15 हजार 177
पॉझिटिव्ह रुग्ण- 3 हजार 161
एकूण मृत-298
रुग्णालयात उपचार- 1 हजार 114
एकूण बरे झालेले- 1 हजार 749
प्रलंबित अहवाल-234
एकूण निगेटिव्ह- 11 हजार 782
ग्रामीणमधील संख्या
अक्कलकोट – 154
मंगळवेढा- 3
बार्शी – 171
माढा- 26
माळशिरस – 11
मोहोळ- 44
उत्तर सोलापूर – 88
करमाळा- 6
सांगोला – 5
पंढरपूर 41
दक्षिण सोलापूर – 268
एकूण – 817
होम क्वारंटाईन – 1 हजार 735
आजपर्यंत तपासणी – 6 हजार 95
प्राप्त अहवाल- 6 हजार 39
प्रलंबित अहवाल- 56
एकूण निगेटिव्ह – 5 हजार 223
कोरोनाबाधितांची संख्या- 817
रुग्णालयात दाखल – 446
आतापर्यंत बरे – 337
मृत 34









